बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात मंगळवारी ३ हजाराहून कमी बाधित रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यात बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ३,३७७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३५,६९३ इतकी आहे. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. बुधवारी राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ८,०४५ होती. तर राज्यात कोरोनामुळे ३४ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ११,२८१ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
बेंगळूरमध्ये सक्रिय रुग्णांची एकूण संख्या १८,८०६ आहे. बेंगळूर शहरी जिल्ह्यात बुधवारी ५,८२७ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. तर बुधवारी बेंगळूरमध्ये १,९५३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तसेच कोरोनामुळे १६ जणांचा बळी गेला. राज्यात आतापर्यंत दरम्यान आतापर्यंत ३९१७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.