बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोनाचा वेग दररोज कमी होत आहे. सोमवारी ६५३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर राज्यात सोमवारी १,१७८ रुग्ण कोरोनावर मात करत घरी परतले. तसेच राज्यात कोरोना संक्रमित आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १२,५४७ आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,०७० जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. सोमवारी बेंगळूर जिल्ह्यात ३०९ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ६५४ रुग्ण कोरोना मुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. जिल्ह्यात सध्या ८,२२५ रुग्ण उपचारात आहेत. दरम्यान शहरी जिल्ह्यात आतापर्यंत ४,३०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.