बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना पॉझिटिव्ह दर कमी कमी होत आहे. शनिवारी राज्यात ७५५ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यात ९७६ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तर ३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सध्या १०,८३४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत १२,०९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात ३४३ पॉझिटिव्ह रुग्णची भर पडली. तर ४६३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर एका कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या ६,९६४ इतकी आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत ४,३२२ रुग्णांचा मृत्यू झालं आहे.