बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये बुधवारी ९७३ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून १,२१७ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला. तसेच राज्यात सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १२,०८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ११,६१० इतकी आहे.
दरम्यन राज्यात सर्वाधिक बाधित रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. बुधवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ५५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ७६५ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या ७,५३४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ४,३११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.