प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना आपत्तीच्या नियंत्रणाखाली पंतप्रधानांच्या निधीला येथील कर्नाटक लॉ सोसायटीने दहा लाख रुपयांची मदत दिली आहे. रकमेचा धनादेश मंगळवारी खासदार सुरेश अंगडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक ऍड. आर. एस. मुतालिक देसाई, ऍड. एम. आर. कुलकर्णी, सचिव विवेक कुलकर्णी यांच्यासह इतर सदस्य हजर होते. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यावेळी उपस्थित होते.