प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हा मुख्यालयात कामावर ज्ग्नााणाऱया शासकीय कर्मचाऱयांसाठी आपत्कालीन सेवा म्हणून मंगळवारपासून एसटी महामंडळामार्फत येथील बस स्थानकामध्ये दोन नव्या लाल परी लावण्यात आल्या. मात्र, जिल्हाधिकाऱयांकडून महामंडळाकडे पाठविलेल्या यादीतील 37 पैकी केवळ चारच कर्मचारी आणि अन्य 5 कर्मचारी आल्याने त्यांना घेऊन एकच गाडी ओरोसला रवाना झाली.
यावेळी कणकवली आगाराचे व्यवस्थापक पी. ए. यादव, स्थानकप्रमुख नीलेश लाड, सहाय्यक कार्यशाळा अधिकारी सुरेश ओटवणेकर, वाहन परीक्षक गोविंद जाधव, सहाय्यक वाहतूक नियंत्रक विकास गायकवाड यांच्यासह चालक कम वाहक एन. आर. घाडीगावकर आणि ए. ए. चिंदरकर आदी या सरकारी कर्मचाऱयांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. पंधरा दिवसांनंतर लाल परी रस्त्यावर धावणार असल्याने आनंद व्यक्त होत होता.
सकाळी 8.45 वाजता बस (क्र. एमएच13 सीयू 8734 आणि 8735) या कणकवली आगारासाठी आलेल्या नव्या कोऱया ब्ल्यूटूथ आणि इलेक्ट्रिक बेल असलेल्या गाडय़ा फलाटावर लावण्यात आल्या. एसटीकडे जिल्हाधिकारी यांच्याकडून कणकवलीसाठी आलेली 37 जणांची यादी होती. पैकी चारच कर्मचारी आले. पाच कर्मचाऱयांचे यादीत नाव नव्हते. तेव्हा एसटी अधिकाऱयांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याशी संपर्क साधला. ओळखपत्र असल्यास त्यांना एसटीमधून जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे या केवळ नऊ प्रवाशांसह एकच एसटी ओरोसकडे रवाना झाली. तर इतर शासकीय कर्मचाऱयांनी स्वत:चे वाहन अथवा चारचाकी वाहनानेच जाणे पसंत केल्याचे दिसत होते.