प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगूट जना पेट्रोल पंप जवळ असलेल्या हॉटेल दिल्ली दरबारच्या स्टोअर रुमला आग लागून आतमधील सामान जळून खाक झाले. या आगीत त्यांचे 3 लाख रुपयांचे नुसकान झाले असल्याची माहिती पीळर्ण अग्निशमन दलाच्या अधिकारी वर्गांनी दिली. आग सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यानव लागली. आगीचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.
घटनेची माहिती पीळर्ण अग्निशमन दलास दिल्यावर दलाचे जवान दामोदर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली विदेश म्हापसेकर, समीर शेटय़े, अनिल खोलकर, भावेश शिरोडकर यांनी घटनास्थळी दहा मिनिटात धाव घेऊन आग विझविली. हॉटेलचे मालक वरून नायर यांनी आग कशी लागली याबाबत माहीत नसल्याचे सांगितले.