ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता सचिन पायलट यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः याबाबत ट्विट करत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले होते त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. तसेच मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे, लवकरच या यातून बाहेर पडेन अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल, आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रसिद्ध वकील अभिषेक मनु सिंघवी आदी नेत्यांना कोरोनाची लागण झाली होती.