महिला काँग्रेसतर्फे वाळपईत कमी दराने कांदा विक्री.
वाळपई / प्रतिनिधी
सध्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा दर मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांची मोठय़ा प्रमाणात गोची झालेली आहे .खासकरून महिला भगिनींना प्रचंड प्रमाणात झळ पोचली असून काँग्रेस कार्यकाळात अशाच प्रकारे कांद्याचा दर वाढल्यामुळे भाजपाच्या महिलांनी थयथयाट केला होता. आता भाजपाच्या महिला फक्त कार्यालयात बसून पत्रकार परिषदा घेत असून त्यांनी सर्वसामान्यांच्या दु:ख समजून घ्यावे .जोपर्यंत सरकार सर्व गोमंतकीयांना समाधानकारक कांदा कमी दरामध्ये उपलब्ध करीत नाही तोपर्यंत काँग्रेस महिला आंदोलन बंद न करण्याचा इशारा गोवा प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी दिला आहे .
आज महिला काँग्रेसतर्फे वाळपईत कमी दराने कांद्याची विक्री करण्यात आली .यावेळी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद लाभला .कांदे खरेदी करण्यासाठी नागरिकांची वाळपईच्या जुन्या नगरपालिका परिसरामध्ये झुंबड उडाली होती .वाळपई महिला काँग्रेस अध्यक्षा रोशन देसाई यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
यासंदर्भाची माहिती अशी की सध्या कांद्याचा दर बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढलेला आहे .यामुळे सर्वसामान्यांना कांदा वापरणे जड झाले असून यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दिवाळीच्या सणात पोहे करताना कांद्याचा चांगल्या प्रकारे वापर करण्यात येत असतो. यंदा मात्र पोहे कांदाविना खावे लागणार असून सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून महिला काँग्रेसतर्फे कमी दराने कांदा उपलब्ध करण्यात आल्याचे प्रतिमा यांनी यावेळी स्पष्ट केले .
यावेळी त्यांनी बोलताना गोवा सरकारने कांद्याच्या वाढत्या दरासंदर्भात कोणत्याही प्रकारचा दिलासादायक निर्णय घेतल्यामुळे चिंता व्यक्त केली. रेशनकार्डवर फक्त एक किलो कांदा उपलब्ध करून सरकार जनतेच्या डोळय़ांना कांदा लावण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी प्रतिमा यांनी केला. गोवा सरकारच्या फलोत्पादन दुकानावर सरकारने अत्यंत कमी दरेमध्ये कांदा उपलब्ध करावा अशा प्रकारची मागणी प्रतिमा कुतिन्हो यांनी महिला काँग्रेसतर्फे केली आहे. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना महिला काँग्रेस अध्यक्ष रोशन देसाई यांनी सांगितले की सत्तरी तालुक्मयात गरीब जनता आहे . त्यांना सध्याच्या दराने कांदा विकत घेणे परवडणारे नाही. त्यामुळे महिला काँग्रेसतर्फे कमी दरामध्ये कांदा उपलब्ध करण्यात आलेला आहे .त्याला चांगला प्रतिसाद लाभल्याचा दावा रोशन देसाई यांनी यावेळी केला. सत्तरी तालुक्मयातील महिला भगिनी या गरीब आहेत. त्यांना सध्याचा दर परवडणारा नाही. यामुळे सरकारने अत्यंत कमी दरेमध्ये प्रत्येक कुटुंबाला समाधानकारक कांदे उपलब्ध करून देण्याची मागणी रोशन देसाई यांनी केली आहे .संध्याकाळी हा कार्यक्रम वाळपईच्या जुन्या नगरपालिका परिसरामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. कांदा कमी दराने मिळत असल्याची वार्ता बाजारामध्ये पसरताच ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी करून कांदे विकत घेतले .यावेळी बऱयाच प्रमाणात झुंबड उडाली होती. मात्र कोणाचीही गोची होणार नाही याची विशेष दखल घेत महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्वांना कांदे कमी दरीमध्ये उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी नगरगाव जिल्हा पंचायत मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उशा मेस्त व इतर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी लालन पार्सेकर रोशनी डिसिल्वा आसिफा शेख प्रियंका साठे, शोभा नेने आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.