प्रतिनिधी /बेळगाव
भाऊराव काकतकर महाविद्यालयात लैगिंक छळ, जाणिव, जागरूकता कायदे आणि उपाय या विषयावर ऍड. आरती वाळवेकर यांनी मार्गदर्शन केले. 21 व्या शतकात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत असल्या तरी स्त्री-पुरुष भेदभाव आजही मानला जातो. लैंगिक हेतूने केलेला स्पर्श लैंगिक शोषण कसे ठरू शकते? त्यावर अंमलात आणण्यात येणारे कायदे कोणते? आणि जागरुकता कशी असावी यावर वाळवेकर यांनी विचार व्यक्त केले.
प्रांरभी डॉ. एस. एल. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अमिता पाटील यांनी परिचय करून दिला. याप्रसंगी प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. कविता पाटील यांनी केले. प्रा. नीता पाटील यांनी आभार मानले.