ऑनलाईन टीम / काबूल :
अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आज सकाळी आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. या स्फोटातून अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह थोडक्यात बचावले. या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सालेह यांचे प्रवक्ते रझवान मुराद यांनी एका वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली.
बुधवारी सकाळी सालेह आपल्या घरातून कार्यालयाच्या दिशेने जात असताना हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता की, सालेह यांच्या गाडीचे तुकडे झाले. शेजाऱ्याच्या इमारतींचेही यात नुकसान झाले आहे.
स्फोटात सालेह यांचे बॉडीगार्ड जखमी झाले आहेत. सुदैवाने सालेह या हल्ल्यातून सुखरूप बचावले. अफगाणिस्तानच्या शत्रूंनी सालेह यांना इजा पोहोचवण्याच्या हेतूने हा हल्ल्या केल्याचे सांगण्यात येते.