कागल / प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथील तहसीलदार कार्यालयासमोर कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली तर दुचाकीस्वार जखमी झाला. बेबीताई रामचंद्र माने (वय ६५ , इंगळी ता. हातकणंगले) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा अनिल रामचंद्र माने हा जखमी झाला आहे.
ठाणे येथील विशाख किशोर लाड हे आपल्या डिझायर कार ( क्र. एम एच ०४ जे एम ३१३६) ने गोव्याकडे जात होते. यावेळी इंगळी येथील अनिल माने हे आपल्या आई सोबत संकेश्वरकडे दुचाकीवरून ( क्र. एम एच १२ बी ८४२०) निघाले होते. येथील तहसीलदार कार्यालयासमोर कारने दुचाकीला पाठीमागून कारची धडक बसली. या अपघातात बेबीताई माने या गाडीवरून उडून रस्त्यावर पडल्या. त्यांना गंभीर जखमी झाल्या व उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तर अनिल माने हे जखमी झाले. कागल पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे .