जगभरात फैलावलेल्या रेल्वेजाळय़ाने प्रवास सोपा केला असला तरीही कथितरित्या अनेक रहस्यमय दुर्घटना होत असतात. इटलीच्या एका रेल्वेचे रहस्य यात सर्वात मोठे आहे. 1911 मध्ये जेनेटी नावाच्या कंपनीची रेल्वेगाडी निर्धारित ठिकाणी पोहोचण्यापूर्वी एका बोगद्यात गायब झाली होती. या रेल्वेतून 100 हून अधिक जण प्रवास करत होते.
जून 1911 मध्ये इटालियन रेल्वेकंपनी जेनेटीने स्वतःच्या रेल्वेगाडीच्या नव्या मॉडेलसाठी फ्री राइडची घोषणा केली होती. याकरता 100 प्रवाशांसह 4 रेल्वे कर्मचारी होते. रेल्वेत खाण्यापिण्याची चांगली व्यवस्था होती. पण प्रवासादरम्यान एका भुयारात पोहोचताच रेल्वे गायब झाली, तिचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, पण कुठलाच थांगपत्ता लागला नव्हता.
प्रत्यक्षात रेल्वेतील 104 लोकांपैकी 2 प्रवासी सुरक्षित बाहेर आले, पण ते मानसिकदृष्टय़ा अत्यंत त्रस्त आणि वाईट अवस्थेत होते. प्रदीर्घ उपचारानंतर हे प्रवासी सामान्य होऊ शकले. पण या घटनेबद्दल काहीही सांगण्याची त्यांची तयारी नव्हती. पुढील काळात हा बोगदा पूर्णपणे बंद करण्यात आला. रेल्वेला एखाद्या पारलौकिक शक्तीने गिळपृंत केल्याचे आणि टाइम ट्रव्हल करत ही रेल्वे भूतकाळात पोहोचल्याचे बोलले जाऊ लागले.
अनेक दशकांनी मेक्सिकोच्या एका डॉक्टरने रुग्णालयात 104 लोकांना भरती करण्यात आले होते आणि त्यांची मानसिक स्थिती विक्षिप्त होती असा दावा केला होता. या लोकांना कुठल्या रेल्वेने आलो याचा तपशील देता येत नव्हता असेही महिला डॉक्टरने म्हटले होते.
अनेक देशांमध्ये दिसल्याचा दावा
इटली, रशिया, जर्मनी आणि रोमानियाच्या अनेक भागांमध्ये ही रेल्वे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेही या रहस्यमय रेल्वेसंबंधी कुठलाच ठोस पुरावा मिळालेला नाही. ही रेल्वे भूतकाळात मेक्सिकोत पोहोचल्याचा दावा मात्र जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला होता.