कास वनसमीतिच्या कर्मचायांनी वणवा आणला आटोक्यात
वार्ताहर / कास
कास परिसरात विघ्नसंतोषी लोंकाकडून वणवे लावुन चायासह वनसंपदेची होरफळ करण्यास प्रारंभ झाला असुन रविवारी कास तलाव कासाणी वाहनतळ परिसर व अनावळे गणेशखिंड परिसरातील वनसंपदा अज्ञाताने लावलेल्या वणव्यात होरफळली असुन कास वनसमीतीच्या कर्मचायांनी कास तलाव व कासाणी कडील वनवा शर्थीचे प्रयत्न करून आटोक्यात अणल्याने अन्य वनसंपदा वाचवण्यात त्यांना यश आले आहे
कास परिसर निसर्गसंपदेने नटला असुन या परिसरात दरवर्षीच उन्हाळ्यात विन्घसंतोषी लोकांकडून वणवे लावुन वनसंपदेची होरफळ केली जाते मात्र अदयाप कोणत्याही ऊपाय योजना होत नसल्याने पर्यावरण प्रेमीमधुन नाराजी व्यक्त होत आहे अदयाप यावर्षी चारा संपुर्ण वाळला नसतानाच वणवे लावण्यास प्रारंभ झाल्याने सुकलेल्या चायासोबत ओल्या चायासह वृक्षांची होरफळ होऊ लागली आहे रविवारी लागलेल्या वनव्यात कास तलाव परिसर कासानी गावाकडील वाहनतळ परिसर व कास रोड लगतच्या गणेश खिंड परिसरातील 30 हुन आधिक एकरच्या क्षेत्रावरील वनसंपदा जळुन खाक झाली असुन कास वनसमीतीच्या योगेश काळे आभिषेक शेलार सिताराम बादापुरे सुजित जांभळे विठ्ठल कदम प्रदीप शिंदे आदी कर्मचायांनी सतर्कता दाखवत कास तलाव वाहनतळ परिसर व कासाणी गावाकडील वाहनतळ परिसरातील वनवा आटोक्यात अणल्याने काहीशी वनसंपदा वनव्याच्या होरपळीतुन वाचवण्यात वनसमीतीच्यात कर्मचायांना यश आले आसले तरी येत्या काळात या परिसरात वनवा कोणी लावणार नाही यासाठी ऊपाययोजना होऊन प्रबोधनाची गरज असुन वनवे लावणायांवर कडक कारवाईची गरज निर्माण झाली आहे