राज्यातील 51.19 लाख जणांना लाभ
बेंगळूर : चालू वर्षातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील दुसरा हप्ता शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे. कर्नाटकातील 51.19 लाख शेतकर्यांना एकूण 1,023 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. सोमवारी हि रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र असणार्या सर्व शेतकरी कुटुंबांना केंद्र सरकारकडून दरवर्षी 6 हजार रुपये अर्थिक मदत दिली जात आहे. सदर आर्थिक मदत तीन टप्यात देण्यात येत असून दर चार महिन्याला एकदा शेतकर्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा केले जातात. राज्यातील 55.19 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळात आहे. 2019 च्या मार्च महिन्यापासून 2021 जुलैपर्यंत केंद्र सरकारकडून एकूण 6940.07 कोटी रुपयांची अर्थिक मदत शेतकर्यांना देण्यात आली आहे. यंदा दुसर्या हHत्यातील 51.19 लाख शेतकर्यांच्या खात्यावर 1,023 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.