सातारा / प्रतिनिधी :
सातारा शहरातून जकातवाडी, परळीला जाणाऱ्या बोगदा परिसरात सकाळी एका माथेफिरूने येणाऱ्या-जाणाऱ्यांना आडवून लोखंडी रॉडने मारहाण करत दहशत माजवली. त्याने चार जणांना मारहाण केल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
विजय गोळे असे या माथेफिरुचे नाव आहे.
सकाळच्या प्रहरी जे कुरणेश्वर परिसरात फिरायला जात होते, त्यांना तो अडवून मारहाण करत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.