ऑनलाईन टीम / पणजी
आम आदमी पार्टीचे कुंकळ्ळी उमेदवार प्रशांत नाईक आणि प्रियोळचे उमेदवार नोनू नाईक यांनी मंगळवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरले. आपचे कुंकळ्ळी उमेदवार प्रशांत नाईक यांनी यावेळी कुंकळ्ळीत आपच विजयी ठरणार असा दावा केला आहे. कुंकळ्ळीवासियांनी आतापर्यंत काँगेस आणि भाजप दोघांच्याही सत्तेचा अनुभव घेतलेला आहे. दोन्ही पक्षांनी कुंकळ्ळीचा विकास करण्यासाठी काही प्रयत्न केले नाही.
प्राथमिक आरोग्य केंद्रासारखी प्राथमिक सुविधाही चांदोर आणि गिर्दोली गावात दोन्ही पक्ष प्रदान करू शकले नाही. कुंकळ्ळी एक शहर आहे परंतु सरकार बाळ्ळी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कुंकळ्ळीत आरोग्य सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आप सत्तेत आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र मी उभारण्यासाठी प्रयत्नरत राहीन, असे नाईक यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भाजप आणि काँग्रेस पक्ष यांनी केवळ स्वतःचा फायद्याचा विचार केला आहे. लोकांची समस्या आणि गावातील गरजा याकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे लोक यावेळी आपला संधी देऊ पाहत आहेत. त्यांना भ्रष्टाचारमुक्त सरकार पाहिजे आहे आणि ते केवळ आपच देऊ शकते.
आप प्रियोळचे उमेदवार नोनू नाईक सांगतात की गेल्या अनेक वर्षांपासून प्रियोळ मतदारसंघांतील लोकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रियोळमध्ये सामाजिक आणि राजकीय बदल घडले नाही. मागील दोन्ही प्रियोळचे आमदार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे यावेळी लोक आपलाच मत देतील असे माझे ठाम मत आहे. गेल्या 15 वर्षांपासून प्रियोलमधून एकही स्थानिक उमेदवार निवडून आलेला नाही. यामुळे प्रियोळ मतदारसंघ विकसित झाले नाही. प्रियोळ मतदारसंघात ३०,३८५ मतदार आणि सात पंचायती असूनही, गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.