प्रतिनिधी /पणजी
भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते तसेच केंद्रीय उद्योग व व्यापार मंत्री पियुष गोयल हे गोवा दौऱयावर आले आहेत. आज गोयल यांनी राज्यातील काही उद्योजकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याशी उद्योग व व्यापार या विषयावर चर्चा केली.
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती मनोज काकुलो यांची पणजी येथे भेट घेतली. धेंपो उद्योगाचे प्रमुख उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांची धेंपो हाऊस येथे गोयल यांनी भेट घेतली. उद्योजक व हॉटेल मालक विक्टर अल्ब?कर्क त्यांची आल्तनो येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. तसेच चार्टड अकाउंटंट आशिष वेर्लेकर यांची मिरामार येथे त्यांच्या निवासस्थानी गोयल यांनी भेट घेतली. या भेटीवेळी गोयल यांनी भाजपच्या गोव्यातील सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या विकास कामाची बुकलेट वरील उद्योजकांना दिली. त्याचबरोबर गोव्यात उद्योगासमोर असलेल्या समस्या जाणून घेतल्या. येत्या काळामध्ये त्या सोडवण्याचे आश्वासनही गोयल यांनी उद्योजकांना दिले .
गोवा विधानसभेची येती निवडणूक डोळय़ासमोर ठेवून येथील उद्योजकाची विविध विषयावर चर्चा करण्यासाठी गोयल हे गोव्यामध्ये दाखल झाले आहेत. ते इतर उद्योजकांशीही चर्चा करणार आहेत.