प्रतिनिधी /वास्को
दाबोळी विमानतळावरील युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनच्या टॅक्सी व्यवसायीकांनी विमानतळावरील बेकायदा टॅक्सी व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे. विमानतळावर अशाच प्रकारातून रविवारी रात्री युनियनच्या टॅक्सी चालकावर हल्ला करण्याची घटना घडलेली असून यात गुंतलेल्याविरूध्द त्वरीत कारवाईची मागणी संघटनेने केली आहे.
दाबोळी विमानतळावर टॅक्सी व्यवसायीक स्पर्धेतून बऱयाच वेळा वादविवाद तसेच हल्ला होण्याच्याही घटना घडत आलेल्या आहेत. रविवारी रात्रीही अशाच वादातून टॅक्सी युनियनच्या पदाधिकाऱयावर हल्ला झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या दाबोळी विमानतळावरील काळय़ा पिवळय़ा टॅक्सी चालकांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध केला व कारवाईची मागणी केली. विमानतळावरील ताज कंपनीच्या टॅक्सी काऊन्टरवरून नियमबाहय़पणे टॅक्सी व्यवसाय होत असल्याचा आरोप युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनने केला आहे. तसेच विमानतळापासून काही अंतरावर आपल्या गाडय़ा पार्क करून बरेच चालक विमानतळावरील टॅक्सी व्यवसायात हस्तक्षेप करतात व टॅक्सी व्यवसाय हिसकावतात असा आरोप करून हे चालक बेकायदा व्यवसाय करीत असून त्यांना कोणतेही नियम लागत नाहीत. ग्राहकांची कोणतीही चौकशी न करता ते विमानळावरील व्यवसाय करतात. प्रवाशांकडून दामदुप्पट वसुलीही करतात. त्यामुळे विमानतळावरील अधिकृत टॅक्सी व्यवसायीकांचे नाव खराब होत आहे असे या संघटनेच्या पदाधिकाऱयांनी म्हटले आहे.
दाबोळी विमानतळावर घडणाऱया विविध गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विमानतळावर पोलीसांची संख्या वाढवण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. टॅक्सी चालकावर झालेला हल्ला तसेच विमानतळावर घडणाऱया बेकायदा टॅक्सी व्यवसायाविरूध्द कारवाई न झाल्यास विमानतळावरच सर्व टॅक्सी व्यवसायीक बेमुदत उपोषणाला बसतील असा ईशारा युनायटेड टॅक्सीमेन्स युनियनने दिला आहे.