बेळगाव : केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल ऍण्ड मेडिकल रिसर्च सेंटर मध्ये 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना सोमवारी लसीकरण करण्यात आले. केएलईचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाने लसीकरणाचा कार्यक्रम पार पडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात आहे. तसेच 10 जानेवारी पासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर व 60 वर्षांवरील ज्ये÷ व्यक्तींना 10 जानेवारी पासून तीसरी लस देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते करण्यात आले. मोफत लसीकरण केले जात असल्याने खासदारांनी केएलईचे कौतुक केले.
यावेळी मेडिकल डायरेक्टर डॉ. एम. व्ही. जाली, प्राचार्या डॉ. एन. एस. महंतशेट्टी, नर्सिंग सायन्सेसच्या प्राचार्या डॉ. सुधा रेड्डी, डॉ. तम्मया मेटगुड, डॉ. राजशेखर सोमनट्टी, डॉ. आशिफ मालदार, पीआरओ शंकर परसण्णावर उपस्थित होते. 80 हून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी लसीकरण करण्यात आले.