नवी दिल्ली : कोविड 19 च्या महामारीमुळे विविध क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनात बदल करीत आहेत. कोविडला थोपविण्यासाठी आवश्यक असणाऱया घटकांवर आता लक्ष केंद्रित केले जात आहे. आता सरकारी क्षेत्रातील कंपनी राष्ट्रीय केमिकल्स ऍण्ड फर्टिलायजर्स लिमिटेड (आरसीएफ) हॅण्ड सॅनिटायझर उत्पादनात उतरणार आहे. सदरच्या सॅनिटायझरचे नाव आरसीएफ सेफरोला असून याला आरसीएफ देशव्यापी वितरण नेटवर्कच्या माध्यमातून बाजारात आणणार असून या सॅनिटायझरमुळे हात खराब होणार नाहीत, असा दावा करण्यात आला आहे, आणि हे उत्पादन रसायन व खते मंत्रालयाच्या अंतर्गत आरसीएफ करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या सॅनिटायर उत्पादनात आयसो प्रोपाइल अल्कोहल (आयपीए) आणि ऍलोविरोचे मिश्रण आहे. आरसीएफने म्हटले आहे, की या जेलची 50 मिलीलिटर आणि 100 मिलिलिटर आकारातील बाटली सादर करण्यात आहेत. सदरच्या बाटलीची किमत क्रमशः 25 आणि 50 रुपये ठेवण्यात आली आहे. आरसीएफ ही कंपनी देशातील केमिकल आणि रसायनाची प्रमुख उत्पादक आहे. कंपनीच्या विविध उत्पादन केंद्रांमध्ये युरिया, कांपलेक्स फर्टिलाझर , बायो फर्टिलायर्स, मायक्रो न्यूट्रिशन, वॉटर सोल्यूबल फर्टिलायजर, सॉयल कंडीशनर्स आणि औद्योगिक केमिकल्सचे उत्पादन केले जाते.
Next Article देतो सांगून 9 लाखांचे दागिन्यांना फसविले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.