कोडोलीत रात्री उशिरा घडली घटना, जिवीत हानी नाही
वारणानगर / प्रतिनिधी
आनंदनगर,कोडोली ता. पन्हाळा येथे घरगुती गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतल्याने घरातील टी.व्ही, फ्रिज,कपडे यासह तीन लाखाचे प्रापंचिक साहित्य लागलेल्या आगीत जळून भस्मसात झाले. शनिवार दि.२७ रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सव्वादोन तोळे सोने व २० ते २५ हजार रोख रक्कमेचे नुकसान झाले.जवळच असलेल्या कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील फायर सिलेंडर उपलब्ध झाल्याने आग विझविणेत यश मिळाले. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.
आनंदनगर येथे मुख्य मार्गावर असलेल्या अलका दिलीप लोहार यांच्या घरातील घरगुती गॅस सिलेंडरने अचानक पेट घेतला अचानक मोठ्या प्रमाणावर आगीचा भडका झाल्याने घरातील लोक घराबाहेर बाहेर पडले. यावेळी जवळ असलेल्या तरूणानी पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने काही तरुणानी जवळच असलेल्या कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील दोन फायर सिलेंडर आणून आग विझविण्यात यश मिळविले. यामध्ये टिव्ही, फ्रिज, कपडे, तिजोरी, भांडी, गॅस शेगडी, असे घरगुती साहित्या तसेच २०ते २५ हजार रोख रक्क्म, दोन तोळ्याचा सोन्याची माळ ब्रॉसलेट आदिचे नुकसान झाले.
आग विझविण्यासाठी ग्रामपंचायत लदस्य मोहन पाटील, श्रीनंद पाटील, अजित पाटील, सुजीत पाटील, स्वप्नील पाटील, सचिन देवाळकर, किरण भोसले, दिपक सावंत, गणेश शिदे ,रणजीत चव्हाण ,दिपक भारमल, निहाल मुजावर, अक्षय गायकवाड आदी तरुणांनी मदत केल्याने आग वेळेत विझवण्यात यश आले.