प्रतिनिधी / वारणानगर
कोडोली ता. पन्हाळा येथील निर्माण सामाजीक संस्थेमार्फत निराधार,तृतियपंथी दिव्यांगाना दिवाळी फराळाचे वाटप करणेत आले. या वेळी संस्थेचे संस्थापक जयदिप पाटील, प्रवीण बजागे आमोल काळे सुनील पोवार रोटरीचे प्रकाश सुर्यवंशी, विकास गायकवाड प्रहारचे सतीश जाधव शिवाजी साळुंखे संदीप किबिले नितीन माने उपस्थित होते.
यावेळी ९० दिव्यांग १० निराधार पाच तृतिय पाथांना फराळा चे वाटप करून दिव्यांग निराधार, तृतीयपंथी यांचा दिपावली उत्सव द्विगुणित करण्यात आला. कोडोली ता. पन्हाळा येथे दिव्यांगाना फराळाचे वाटप करताना जयदीप पाटील, प्रविण बजागे, अमोल काळे, सुनिल पवार आदि. मान्यवर यावेळी उपस्थित होते.