प्रतिनिधी / बार्शी
पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशीवकर यांच्या विशेष पथकाने आज कोरफळे येथे धाड टाकून सुमारे 25 हजार रुपयांचे देशी मद्य जप्त केले आहे.
अधिक माहिती अशी की ,कोरफळे ता बार्शी येथे बेकायदेशीर विक्री करण्यासाठी देशी विदेशी दारूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती मिळालेवरून पोलीस नाईक संदेश पवार, माने , मुजावर आदींनी आज शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोरफळे येथील शोभाताई नगर येथील सिमेंट रोडलगत असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये दारूचा साठा असल्याची खात्रीपूर्वक माहिती मिळाली होती.
त्यावरून पंचा समक्ष शेड चा दरवाजा उघडला असता आतमध्ये छापडीचे बॉक्स आढळून आले.
त्यामध्ये टॅगो कंपनीच्या १८० मिली च्या व ५२ किंमतीच्या ४८ बाटल्या असलेले आठ बॉक्स मिळून आले तसेच ढोकी संत्रा नांवाचे ४८ बाटल्या असलेले दोन बॉक्स मिळून आले आहेत. अशी एकूण पंचेविस हजार रुपयांची दारु जप्त करून पत्र्याचे शेड बाबतीत माहिती घेतली असता सदर शेड हे गावातील आण्णासाहेब विठ्ठल माने याचे असल्याचे सांगितले याबाबत संदेश पवार यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.