बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. ९६ टक्क्याहून अधिक रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. तरीही कोरोना महामारीची दुसरी लाट आल्यास कर्नाटक सरकार पूर्णपणे तयार असल्याचे राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी म्हंटले आहे. १० जिल्हा रूग्णालय आणि ३० तालुका रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेटर आणि इतर उपकरणांच्या खरेदीसाठी ३७.७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत.
मंत्री सुधाकर शुक्रवारी टास्क फोर्स समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर विधान सौधा येथे पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री सुधाकर यांनी टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांची नियुक्ती करण्यात आली असून पुढील ३ महिन्यांपर्यंत संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी मुद्द्यांवर चर्चा केली जाईल. ११.३२ कोटी रुपये वेगवान अँटीजेन किट्स खरेदीसाठी ठेवण्यात आले असून पुढील ९० दिवसांसाठी औषध खरेदी करण्यासाठी २२.५० कोटी रुपये देण्यात आले आहेत.
रेमेडिसवीरसाठी शासकीय दर १८०० रुपये निश्चित करण्यात आला आहे. आम्हाला काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की काही खासगी रुग्णालये या औषधासाठी अधिक शुल्क आकारत आहेत. अशा रुग्णालयांवर केपीएमई कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला.
डॉ. सुधाकर यांनी बेंगळूर शहरी जिल्ह्यासह १० जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांसमवेत कोविड संदर्भात आढावा बैठक घेतली. मंत्री सुधाकर यांनी कोरोनाची संभाव्य दुसरी लाट लक्षात घेऊन नवीन वर्ष, सार्वजनिक कार्यक्रम मर्यादित प्रमाणात साजरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २० डिसेंबरपासून दुसर्या आठवड्यात किमान बैठका घ्याव्यात, असेही निर्देश देण्यात आले आहेत