नव्याने तेरा पॉझिटिव्ह : कोरोनामुक्त रुग्णसंख्या 5824 : सक्रिय रुग्ण 300
प्रतिनिधी / ओरोस:
जिल्हय़ात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 155 वर पोहोचली आहे, तर नव्याने तेरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी शनिवारी येथे दिली.
सावंतवाडी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांना क्षयरोगाचा आजार होता. तर मालवण तालुक्यातील 66 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता. नव्याने तेरा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 हजार 824 झाली आहे. तर पाच हजार 365 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत 155 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. सद्यस्थितीत जिल्हय़ात 300 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हय़ातील सद्यस्थिती : शनिवारचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण तेरा, सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 300, सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्हय़ाबाहेर गेलेले रुग्ण सहा, बरे झालेले रुग्ण 5,365, मृत झालेले रुग्ण 155, एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 5,824, चिंताजनक रुग्ण पाच.
तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण : देवगड – 410, दोडामार्ग – 327, कणकवली – 1789, कुडाळ – 1307, मालवण – 476, सावंतवाडी – 800, वैभववाडी – 176, वेंगुर्ले – 522, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – 17.
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण : देवगड – 18, दोडामार्ग – 31, कणकवली – 92, कुडाळ – 61, मालवण – 18. सावंतवाडी – 36, वैभववाडी – 18, वेंगुर्ले – 22, जिल्हय़ाबाहेरील – चार.
तालुकानिहाय मृत्यू : देवगड – नऊ, दोडामार्ग – तीन, कणकवली – 39, कुडाळ – 29, मालवण – 16, सावंतवाडी – 41, वैभववाडी – सात, वेंगुर्ले – 10, जिल्हय़ाबाहेरील रुग्ण – एक.
आर. टी. पी. सी. आर. आणि ट्रुनॅटटेस्ट टेस्ट रिपोर्टस् : तपासलेले नमुने शनिवारी 62, एकूण 28,335. पॉझिटिव्ह आलेले नमुने 4097.
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने : शनिवारी 90, एकूण 20,616, पैकी पॉझिटिव्ह 1848, अतिदक्षता विभागात – पाच. ऑक्सिजनवर – चार, व्हेंटिलेटरवर – एक.