प्रतिनिधी / ओरोस:
पोस्टाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या, निवृत्ती वेतनसंबंधी तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी गोवा पोस्टल क्षेत्रीय कार्यालयातर्फे ‘पेंशन अदालत’चे आयोजन केले आहे. ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ांचा समावेश आहे. पोस्ट मास्तर जनरल, क्षेत्रीय कार्यालय पणजी (गोवा) येथे 30 डिसेंबर रोजी सायंकाळी तीन वाजता पेन्शन अदालत आयोजित करण्यात आलेली आहे.
डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱयांच्या निवृत्ती वेतन (पेन्शन) संबंधी ज्या तक्रारीचे निवारण 3 महिन्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा सर्व तक्रारीची या डाक पेन्शन अदालतमध्ये दखल घेतली जाईल. कायदा संबंधित प्रकरणे उदा. उत्तराधिकार तसेच धोरणात्मक स्वरुप संबंधित तक्रारी पेंशन अदालतमध्ये विचारात घेतली जाणार नाहीत. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशिलांसह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱयास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी. संबंधितांनी पेंशनबाबतची आपली तक्रार श्री शिव कुमार वर्मा, वरि÷ लेखाधिकारी क्षेत्रीय पणजी गोवा या कार्यालय यांचे नावे अतिरिक्त प्रतिसह 20 डिसेंबर अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा रितीने पाठवावी. 20 डिसेंबर रोजीच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जावर पेन्शन अदालतमध्ये विचार करण्यात येणार नाही, असे आवाहन गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजीच्या पोस्टमास्तर जनरल यांनी केले आहे. leteDuration