- गेल्या 24 तासात 141 नवे रुग्ण; 134 जणांना डिस्चार्ज
ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत मागील 24 तासात 141 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे दिल्लीतील कोरोना बाधितांची एकूण संख्या 6 लाख 37 हजार 087 वर पोहचली आहे. यामधील 1,036 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 134 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहेे. तर आतापर्यंत 6 लाख 25 हजार 158 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 10,893 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ताज्या आकडेवारी नुसार, दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 16 लाख 07 हजार 957 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 28,852 आरटीपीसीआर टेस्ट आणि 10,213 रैपिड एंटिजेन टेस्ट एका दिवसात करण्यात आल्या आहेत.