प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वे स्टेशन येथील शहर उपविभाग 1 या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी सकाळी स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून हे कार्यालय डाऊन करण्यात आले. शुक्रवार शनिवार व रविवार असे तीन दिवस हे कार्यालय आता बंद ठेवण्यात येणार आहे. शहरात कोरणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ता सरकारी कार्यालयातील अधिकार्यांनाही कोरोणाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून सरकारी कार्यालय बंद ठेवण्यात येत आहेत.