ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहिम सुरू आहे. त्यातच आता लसीकरण मोहिमेचा वेग वाढावा यासाठी नवनवीन उपाय शोधले जात आहेत. आता व्हॉट्सऍपच्या मदतीनेही आपल्याला कोरोनावरील लसीसाठी नोंदणी करता येणार आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी ट्विट करीत माहिती दिली आहे.
मंडाविया यांनी सांगितले की, आता आपण व्हॉट्सऍप वर देखील कोरोना लसीची नोंदणी करता येणार आहे. व्हॉट्सऍपवरून स्लॉट बुक करण्यासाठी तुम्हाला MyGovIndia Corona Helpdesk बुक स्टॉल असे लिहून पाठवले तर तुमचा लसीचा स्टॉल बुक होईल. यासाठी आधी 9013151515 या नंबरवर व्हॉट्सऍप करावे लागेल. त्यांनर आपल्यास एक ओटीपी येईल. तो टाकल्यावर लसीचा स्टॉल बुक होणार आहे. तसेच तुम्ही लस घेतली असेल तर या हेल्पलाइनवरून आपले प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. आतापर्यंत 32 लाख नागरिकांनी व्हॉट्सऍपद्वारे आपले प्रमाणपत्र डाउनलोड करता येणार आहे.
दरम्यान, मागील 24 तासांत 6385298 नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे. देशात आतापर्यंत एकूण 58.89 नागरिकांनी कोरनाची लस घेतली आहे.