सांबरा येथे सत्कारप्रसंगी डॉक्टरांचा नागरिकांना सल्ला
वार्ताहर / सांबरा
सध्या कोरोना रोगामुण्s सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाल घाबरूही नका आणि निष्काळजीही राहू नका. स्वच्छता पौष्टिक आहार आणि व्यायाम यामुळे कोरोनावर मात करता येते. असे मौलिक विचार डॉक्टर प्रकाश शिंदे यांनी व्यक्त केले. ते शुक्रवार दि. 11 रोजी सांबरा येथे देवस्थान कमिटीतर्फे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थांनी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई होते.
येथील डॉक्टरांनी कोरोना काळातही आपापले दवाखाने सुरु ठेवून रुग्णांची सेवा केली आहे. त्यामुळे देवस्थान कमिटीने गावातील सर्व डॉक्टरांचा सत्कार येथील लक्ष्मी मंदिरात केला.
प्रारंभी माजी ग्रा. पं. सदस्य महेश जत्राटी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. रवि देसाई, डॉ. सुधाकर पाटील, डॉ. रविंद्र सप्ले, डॉ. प्रशांत पाटील व डॉ. यरगण्णावर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन देवस्थान कमिटीतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शंकर जत्राटी व वाय. के. धर्मोजी यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रामास नागनगौडा पाटील, ईराप्पा जोई, चप्रु पाटील, सिद्राई यड्डी, मुकूंद मुतगेकर, शिवाजी देसाई, रामचंद्र देसाई, भीमसेन ढवळी, सुरेश देसाई, शिवानंद कुलकर्णी, शिवाजी जत्राटी, प्रभाकर यड्डी, मनोहर जोई, सिद्राई तिप्पान्नाचे, मल्लाप्पा कांबळे, यल्लाप्पा जाधवसह ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी राजू रथकार यांनी आभार मानले.