सावंतवाडी / प्रतिनिधी-
कोलगाव ग्रामपंचायतीच्यावतीने उभारण्यात आलेल्या सौम्य कोरोना रुग्णांसाठीच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे उद्घाटन उद्या सोमवारी दुपारी बारा वाजता कोलगाव तिठा येथे पाटिदार दार समाजाचा हॉलमध्ये माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे सुंदर सुसज्ज सुविधायुक्त असे हे सेंटर उभारण्यात आले आहे या सेंटरला नुकतीच भेट जिल्हा पोलीस प्रमुख राजेंद्र दाभाडे यांनी दिली होती त्यानंतर आता या कक्षाचे उद्घाटन श्री राणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती सरपंच संतोष राऊळ यांनी दिली