शहरात चौघांचा मृत्यू, सक्रीय रूग्णसंख्या सहा हजारांखाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 18 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 411 नवे रूग्ण आढळले तर 805 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 5 हजार 918 झाली आहे. जिल्ह्यात नव्या रूग्णांसह, कोरोना मृत्यू, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने 18 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 5 हजार 482 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 966, नगरपालिका क्षेत्रात 763, शहरात 1 हजार 177 तर अन्य 576 आहेत. दिवसभरात 805 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 83 हजार 513 झाली आहे. गेल्या 24 तासांत 411 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 7, भुदरगड 2, चंदगड 8, गडहिंग्लज 18, गगनबावडा 0, हातकणंगले 56, कागल 39, करवीर 53, पन्हाळा 17, राधानगरी 3, शाहूवाडी 4, शिरोळ 18, नगरपालिका क्षेत्रात 58, कोल्हापुरात 120 तर अन्य 8 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 94 हजार 913 झाली आहे.
कोल्हापूर शहरातील चौघांचा मृत्यू
परजिल्ह्यातील निपाणी बेळगाव येथील एकाचा सोमवारी कोरोनाने मृत्यू झाला. शहरात 120 नवे रूग्ण दिसून आले. कोरोनाने चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये नाना पाटील नगर, मंगळवार पेठ, संभाजीनगर, पंचगंगा तालीम येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण : 411, एकूण : 1,94,913 कोरोनामुक्त : 805, एकूण : 1,83,513 कोरोना मृत्यू : 18, एकूण मृत्यू : 5482 सक्रीय रूग्ण : 5918