प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना महामारीत ऑक्सिजनची नेमकी गरज ओळखून चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून सिद्धगिरी कणेरीमठ येथे लोकसहभागातून ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. तब्बल 53 लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्रकल्प उभारला. ऑक्सिजन प्रकल्पासाठी मदत केलेल्या संस्था, व्यक्तींचा गौरव करत शनिवारी ऑक्सिजन प्रकल्पाचे लोकार्पण झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि कणेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. दररोज 120 टाकी इतके ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
यावेळी राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, गांधीनगर येथील व्यापारी शंकर दुल्हाणी यांची प्रमुख उपस्थिती होती. सिद्धगिरी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्राचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या सेवाभावी कार्याची माहिती दिली. डॉ.रेषम राजपूत यांनी आभार मानले.
ऑक्सिजन प्रकल्पासाठी मदत केलेल्या मान्यवरांचा सत्कार झाला. यामध्ये श्यामसुंदर मर्दा, शंकर दुल्हाणी, सुरेंद्र जैन, ललित गांधी, विनोद कंकाणी, अमित भिडे-इचलकरंजी, माधवराव घाटगे, डॉ. प्रकाश गुणे, बंटी भांगडिया, विठ्ठलराव खोराटे, आप्पासाहेब मोहिते-घुणकी, सुनिल राजाराम अस्वले, रविंद्र कागवाडे, राहुल पाटील व आनंद पाटील -मुंबई, शेखर चरेगावकर, डॉ. रोंगे- पंढरपूर, भावेश पटेल, नरेश चंदवाणी, माणिक पाटील चुयेकर प्रा. भारत खराटे, भाजपाचे जिल्हा संघटन सचिव नाथाजी पाटील, विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील, विजय जाधव यांचा समावेश आहे.