प्रतिनिधी / कोल्हापूर
येथील लक्षतीर्थ वसाहतीतील 70 वर्षीय वृद्धेचा शुक्रवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे जिल्हÎातील कोरोना बळींची संख्या 1 हजार 722 झाली आहे. गेल्या 24 तासांत 20 नवे रूग्ण दिसून आले. आठ जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 653 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी शुक्रवारी दिली.
जिल्ह्यात आजपर्यत कोरोनाने 1,722 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 848, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 370 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे.
सध्या 74 सक्रीय रूग्ण आहेत. शुक्रवारी दिवसभरात 653 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून शुक्रवारी 1 हजार 152 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 121 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 82 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 107 रिपोर्ट आले, त्यापैकी 101 निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 1, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 2, करवीर 4, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहर 9 व अन्य 2 असे 20 रूग्ण आहेत. दिवसभरात आठ जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 113 झाले. नव्या 20 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 909 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 20, कोरोनामुक्त 8, कोरोना मृत्यू 1
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 909
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 113
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 74
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1722
गेल्या 24 तासांत 653 संशयितांची तपासणी