प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला, गेल्या 24 तासांत 49 नवे रूग्ण मिळून आले तर 43 जण कोरोनामुक्त झाले. तसेच 270 संशयितांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद नव्हती, पण मंगळवारी कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे येथील 75 वर्षीय महिला आणि करवीर तालुक्यातील कळंबा येथील 50 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील 58 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 646 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 811, नगरपालिका क्षेत्रात 338, कोल्हापूर शहरात 359 तर अन्य जिल्ह्यांतील 138 जणांचा समावेश आहे.
दिवसभरात 43 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 45 हजार 701 झाली. तसेच 49 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 48 हजार 272 झाली आहे. सध्या 925 रूग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात 270 जणांची तपासणी केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून मंगळवारी 389 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 353 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 91 रिपोर्ट आले. त्यापैकी 87 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 1, भुदरगड 0, चंदगड 3, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 4, कागल 2, करवीर 0, पन्हाळा 0, राधानगरी 1, शाहूवाडी 2, शिरोळ 4, नगरपालिका क्षेत्रात 9, कोल्हापूर शहर 20, अन्य 3 असे 49 रूग्ण असल्याची माहिती डॉ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleबडोदा बँक मिरज शाखेला 17 कोटींचा गंडा
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.