प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 1 हजार 499 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 950 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 40 झाली आहे. कोरोना मृत्यू वाढले असले तरी वाढलेले कोरोनामुक्त आणि सक्रीय रूग्णसंख्येत झालेली घट महत्वपूर्ण आहे.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 37 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 66 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 131, नगरपालिका क्षेत्रात 626, शहरात 816 तर अन्य 493 आहेत. मृतांमध्ये जिल्ह्यांतील 30 जण आहेत. दिवसभरात 1 हजार 950 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 12 हजार 186 झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 499 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 71, भुदरगड 52, चंदगड 27, गडहिंग्लज 53, गगनबावडा 4, हातकणंगले 145, कागल 69, करवीर 240, पन्हाळा 108, राधानगरी 36, शाहूवाडी 21, शिरोळ 92, नगरपालिका क्षेत्रात 120, कोल्हापुरात 411 तर अन्य 50 जणांचा समावेश आहे. एकूण रूग्णसंख्या 1 लाख 28 हजार 292 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 3 हजार 104 अहवाल आले. त्यापैकी 2 हजार 486 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 4 हजार 500 अहवाल आले. त्यातील 3 हजार 994 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 1 हजार 724 रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 304 निगेटिव्ह आहेत. दिवसभरात 9 हजार 328 स्वॅब रिपोर्ट आले.
शहरातील चौघांचा तर परजिल्ह्यांतील 7 जणांचा कोरोनाने मृत्यू
दरम्यान, गुरूवारी कोरोनाने मृत्Îू झालेल्यांत परजिल्ह्यांतील 7 जण आहेत. यामध्ये निपाणी, मांगूर, सांगली, तडसर, कित्तूर, चिकोडी कणकवली येथील तर शहरातील राजारामपुरी, प्रतिभानगर, कात्यायिनी कॉम्प्लेक्स, बालाजी पार्क येथील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला.
कोरोना रूग्ण 1499 ः एकूण ः 128292
कोरोनामुक्त 1950 ः एकूण ः 112886
कोरोना मृत्यू 37 ः एकूण मृत्यू ः 4066
सक्रीय रूग्ण ः 12040