प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळून आले तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात 55 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील ऍक्टीव्ह रुग्णंसख्या 501 इतकी आहे.
आरोग्य विभागाकडून शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी राधानगरी आदी तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. तर भुदरगड, कागल, गडहिंग्लज तालुक्यात प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला. तर शिरोळ तालुक्यात 3 आणि हातकणंगले, करवीर तालुक्यात 4 रुग्ण मिळून आले. कोल्हापूर शहरात आठ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीच्या 393 अहवालातून 1, अँटीजेनच्या 449 अहवालामधून 3 आणि खाजगी लॅबच्या 2 हजार 2827 अहवालापैकी 26 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले.