प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी, म्युकर मायकोसीसने 6 जणांचा मृत्यू झाला. 3 नवे रूग्ण दाखल झाले. तर म्युकरमुक्त 7 जणांना घरी पाठवण्यात आले. शहरातील सीपीआरमध्ये सोमवारी म्युकर मायकोसीसने 6 जणांचा मृत्यू झाला तर 3 नवे रूग्ण दाखल झाले.
सीपीआरमधून 7 जणांना डिसचार्ज देण्यात आला, सध्या सीपीआरमध्ये 90, खासगी हॉस्पिटलमधून 45 आणि जिल्ह्यात अन्य ठिकाणी 5 म्युकर रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत 140 रूग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यत म्युकरने 42 जणांचा मृत्यू झाला आहे तर 52 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.