प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने एकाही मृत्Îूची नोंद झालेली नाही. कोरोना मृत्यू निरंक राहिला. गेल्या 24 तासांत 14 नवे रूग्ण दिसून आले तर 11 कोरोनामुक्त झाले. तसेच 257 जणांची तपासणी क्नाली. सक्रीय रूग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात बुधवारी कोरोनाने मृत्यूची नोंद निरंक राहिली. आजपर्यत केरोनाने 1 हजार 698 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 838, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 363 तर अन्य 150 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या 87 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 257 जणांची तपासणी केली. त्यातील 121 जणांची ऍटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून बुधवारी 757 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 745 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 121 रिपोर्ट आले. त्यापैकी 120 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 113 रिपोर्ट आले, त्यापैकी 104 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहर 9 असे 14 रूग्ण आहेत. दिवसभरात 11 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 640 झाले. नव्या 14 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 425 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 14, कोरोनामुक्त 11, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 425
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 640
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 87
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1698
गेल्या 24 तासांत 257 संशयितांची तपासणी