प्रथमच नवी रूग्ण नोंद शंभराच्या खाली, 5 मृत्यू, 82 नवे रूग्ण, 109 कोरोनामुक्त, परजिल्ह्यातील मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी निरंक
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शहरातील दोघे व जिल्ह्यातील तिघे आहेत. दिवसभरात 82 नवे रूग्ण आढळले तर 109 जण कोरोनामुक्त झाले. पाच महिन्यानंतर प्रथमच नवी रूण्णसंख्या 100 च्या खाली आली आहे. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 140 झाली आहे. परजिल्ह्यातील मृत्यूंची नोंद दुसऱ्या दिवशीही निरंक राहिली.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील अंबाई टंक आणि शाहूपुरी 7 वी गल्ली, जिल्ह्यातील, बांबवडे, गडमुडशिंगी आणि इचलकरंजी येथील व्यक्तींचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5,728 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3063, नगरपालिका क्षेत्रात 822, शहरात 1247 तर अन्य 596 आहेत.
दिवसभरात 109 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 98 हजार 271 झाली आहे. गेल्या 24 तासांत 82 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 5, गगनबावडा 0, हातकणंगले 11, कागल 3, करवीर 10, पन्हाळा 5, राधानगरी 4, शाहूवाडी 1, शिरोळ 6, नगरपालिका क्षेत्रात 15, कोल्हापुरात 19 तर परजिल्ह्यातील 5 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 5 हजार 139 झाली आहे. जिल्ह्यात आजरा, चंदगड, भुदरगड आणि गगनबावडा येथे नवी रूग्ण संख्या नोंद शुन्य राहिली. सद्यस्थितीत शहरात 25 आणि ग्रामीण भागात 283 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोरोना रूग्ण : 82 एकूण : 2,05,139
कोरोनामुक्त : 109 एकूण : 1,98,271
कोरोना मृत्यू : 5 एकूण मृत्यू : 5728
सक्रीय रूग्ण : 1140