प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या सभासदांना इएसआयसी योजनेतून आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत. अशी घोषणा चेअरमन के. डी. पाटील यांनी सर्वसाधारण सभेत केली. त्याचबरोबर प्रॉव्हीडंट फंड योजनाही लागू केली आहे. त्याचा लाभ सर्व कर्मचारी यांनी घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
संस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्ही. टी. पाटील सभागृहात पार पडली. या सभेत ते बोलत होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
ते म्हणाले, 21 वर्षात चिकाटीने केलेला कारभार आणि गोकुळच्या मदतीतून आज संघटना भक्कमपणे उभी आहे. सभासदांच्या हिताने अनेक निर्णय घेतले आहेत. सभासद व त्याच्या पत्नीला 1 लाख रुपयाचे विमा संरक्षण तर सभासदाचा नैसर्गिक मृर्त्यू आल्यास तीस हजार रुपये मदत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी मोठे योगदान दिले आहे.
यावेळी दहावीत गुणवत्ता मिळवलेल्या सभासदांच्या पाल्यांचा, कोरोना काळात काम केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जी. भुवनेश्वरी, कविता शिंदे, सुभाष गुरव, शामराव पाटील, विश्वास पाटील, सुरेश पाटील व्हाईस चेअरमन शामराव पाटील यांनी आभार मानले.
संस्थेची सांपत्तीक स्थीती रुपयात
सभासद 9 हजार
तरतुद 4 कोटी 2 लाख 96 हजार
रोख, बॅंक शिल्लक 6 लाख 3 हजार
गुंतवणूक 1 कोटी 4 लाख
स्थावर मालमत्ता 38 लाख 74 हजार