प्रतिनिधी / हातकणंगले
जागतिक महामारीच्या संकटांना न घाबरता कोविड रुग्णांवर औषधोपचार करणारे, डॉक्टर व खांदयाला खादा लावून काम करणारे वैद्यकीय स्टाफ, या काळात स्वच्छता करणारे सफाई कामगार, तसेच अहोरात्र ड्युटी करणारे पोलीस यंत्रणा हेच खरे योध्दे असून त्याचे कौतूक होणे गरजेचे होते, म्हणूनच मी या ठिकाणी आलो असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा भाजप (ग्रामीण)चे जिल्हा अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते आतिग्रे ता. हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठमध्ये असलेल्या कोविड सेंटरच्या भेटी दरम्यान बोलत होते. बोलताना पुढे म्हणाले, प्लेगच्या महामारीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांनी केलेल्या नियोजनामुळे जिल्हाचा मुत्युदर कमी होता, यावेळीही कोरोनामध्ये या कोविड योध्दाच्या प्रयत्नामुळे इथली स्थिती चांगली आहे असे सांगत सर्वाबद्धल गौरवउद्गार काढले.
यावेळी जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरुणराव इंगवले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य इंगवले, वैद्यकीय अधिकारी उत्तम मदने, यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमास तहसिलदार प्रदिप उबाळे, जि.प सदस्य प्रसाद खोबरे, वैधकिय अधिकारी सुहास कोरे नगर सेवक राजू इंगवले, अमर इंगवले, राजेश पाटील, राजू सुर्यवंशी, रमजान मुजावर, दिनानाथ मोरे, आण्णासाहेब चौगुले, बाळासाहेब गारे, राहूल महाजन, मुनीर मुजावर, पुंडलिक बिरंजे, पंकज बुढे, श्रावण आळतेकर, देवराज कांबळे, संतोष कांबळे.