जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यांची मागणी
प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळगडावर जाणारा मुख्य रस्ता भूस्खलनाने खचला आहे. गडावर जाणारा कोणताही पर्यायी मार्ग नसून रस्ता दुरुस्त होईपर्यंत सर्वच तालुकास्तरीय कार्यालये वाघबीळ येथे स्थलातंरित करावीत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पन्हाळ गडावर जाणारा रस्ता गतवेळेला खचला त्यावेळी देखील तालुकास्तरीय कार्यालयातील सर्व शासकीय कामे ठप्प झाली होती एखादा प्रसंग घडल्यावर पन्हाळ्यावर जाणेसाठी पर्यायी रस्ता हवा अशी मागणी होते तथापी शासन स्तरावर कोणत्याच प्रक्रिया पूर्ण केल्या जात नाहीत त्यामुळे प्रत्येक प्रसंगाला फक्त चर्चा होते असे जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी सांगून सद्या खचलेला रस्ता कायम सुरळीत होण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागेल तो पर्यन्त सर्व शासकीय कामकाज वाघबीळ येथील एकलव्य किंवा फोर्ट स्कूलच्या इमारतीत किंवा सोयीच्या ठिकाणी चालू करून जनतेची गैरसोय टाळवी असे निवेदनात म्हटले आहे.
शासकीय सेवेत बाहेरून येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना तीन दरवाजा मार्ग किंवा बुधवार पेठेत वहाणे लावून चालत कार्यालयात जावे लागेल जनतेला देखील सर्वच कार्यालयात चालत जाणे शक्य नाही याशिवाय अपंग, वयोवृध्द नागरिकांना तसेच शासकीय कर्मच्या ऱ्यांना अशा परस्थितीत गडावर जाणे शक्य नाही असे सांगितले.
प्रांताधिकारी, तहसिल,निबंधक कृषी, पंचायत समिती, न्यायालय, भूमिअभिलेख यासह दैनदिन नागरिकांना कामकाजासाठी आवशक असणारी कार्यालये मर्यादीत कालावधीसाठी वाघबीळ येथे स्तलातंरीत करणे जनतेच्या सोयीचे व हिताचे ठरणार आहे यासाठी प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलावीत असे निवेदनात श्री. मोरे यानी म्हटले आहे.
पन्हाळगडावर येण्यासाठी इजिमा १७ ला मिळणारा ग्रामीण मार्ग ५८ हा सन २०२० – २१ च्या रस्ते आराखड्यात सूचीबध्द आहे हा पन्हाळगडावर येण्यासाठी उपयुक्त पर्यायी मार्ग असून पन्हाळा व शाहूवाडी या दोन तालुक्यांना जोडणारा आहे पन्हाळा विशाळगड ट्रेकींग मार्ग म्हणूनही या मार्गाचा वापर होतो सुमारे एक कि.मी. च्या अंतरासाठी एक कोटी रू. गरज व वनविभागाची मान्यता आवशक असल्याचा अहवाल पंचायत समितीच्या सहा अभियंता एम.आर. पाटील यानी जिल्हा प्रशासनाला देवून देखील पन्हाळगडाच्या पर्यायी मार्गाबाबत कोणतीही कार्यपूर्ती झाली नसल्याचे देखील जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे यानी सांगीतले.