प्रतिनिधी / कोल्हापूर
मटका जुगाराच्या गुन्ह्यामध्ये सहआरोपी न करणार नाही, असे सांगून एका युवकाकडून 60 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन, 40 हजारांची लाच स्विकारताना राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह एका कॉन्स्टेबल आणि पंटरला लाच घेताना कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडून अटक केली. ही कारवाई शनिवारी दुपारी केली.
पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव, कॉन्स्टेबल रोहित पवार (बक्कल नंबर 1641) आणि पंटर रोहित रामचंद्र सोरप (रा. उजळाईवाडी, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक गुरव यांची राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या प्रमुखपदी गेल्या काही दिवसापूर्वी पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी निवड केली होती.