इचलकरंजीतील घटना ; सुनिल चव्हाण असे लाचखोर सहाय्यक अभियंत्याचे नाव
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या कार्यालयात सहा हजार रुपयांची लाच स्विकारताना कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला रंगेहाथ पकडले. सुनिल चव्हाण (रा. विश्रामबाग, सांगली) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी केली असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरु होते.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, घरगुती विज जोडणी कनेक्शन मंजूर करण्यासाठी सहाय्यक अभियंता सुरेश चव्हाण यांनी सरकारी विज जोडणी ठेकेदार उमेश निशीकांत माळी ( रा. काडापूरे तळ, इचलकरंजी ) यांच्याकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती सहा हजाराची लाच स्विकारताना त्याला कोल्हापूर लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.