पाटगांव / वार्ताहर
शिवडाव येथील रेडे ओहळ जंगलात दाखल झालेल्या टस्कर हत्तीने मुक्काम वाढवल्याने शेतकऱ्यासह ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हत्तीच्या भितीमुळे शिवारातील शेतीची कामे खोळंबली आहेत.पाच दिवसांपुर्वी शिवडावमध्ये टस्कर हत्ती दर्शन दिले होते. येथील परिसरात टस्कर हत्तीने धुमाकूळ घातला असून खाण्यापेक्षा पिकांची नासधूस अधिक प्रमाणात झाली आहे. ऊस व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. टस्कर रात्रीच्या वेळी उसाचाशेतीतून जात असल्याने मोठ्या पायांच्यामुळे पिके जमीनदोस्त होत आहे. या भागात असणारे मुबलक फणस व मेस काठी खायला मिळत असल्यापुळे आणि राहण्यासाठी जंगल असल्याने टस्कर हत्तींन शिवडाव येथील रेडे ओहळ जंगलचा आसरा घेतला दिवसा जंगलात तर रात्री नागरी वस्तीत हत्तीचे येत असल्याने ग्रामस्थामध्ये भिती निर्मान झाली आहे.
दरम्यान वनविभागाचे वनपाल के.डी. जमादार, एस.डी. इंदुलकर, वनरक्षक जॉन डिसोझा, एन बी सोनटके, विजय विजय शिदे आणि वनमजुर यांनी रात्री पेट्रोलिंग करत हत्तीला नागरीवस्तीकडे येण्याचे रोखण्यासाठी फटाके लावत आहेत. पण हत्तीकडून हुलकावणी मिळत असल्याने वनविगातील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दरम्यान हत्ती पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी करू नये तसेच हत्तीचा वावर असलेल्या शेतामध्ये आणि गावातील शिवारामध्ये ग्रामस्थांनी रात्रीच्यावेळी जाऊ नये असे आवाहन वन विभाग व शिवडाव गावच्या ग्राम समितीने नागरिकांना केले आहे.