बेळगाव /प्रतिनिधी
अझमनगर येथील कोविड केअर सेंटरच्यावतीने कोरोनाकाळात घरोघरी जाऊन उपचार करणाऱया डॉक्टर, नर्स यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम मेजबान फंक्शन हॉल येथे पार पडला.
कोरोनाकाळात अनेक रुग्णांना रुग्णालयात भरती करून न घेतल्यामुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले. तसेच अनेकांची परिस्थिती देखील हालाखीची असल्याने काहीजणांनी घरीच आपल्या नातेवाईकांवर उपचार केले. यावेळी घरोघरी जाऊन ऑक्सिजन, सलाईन, इंजेक्शन, गोळय़ा देण्याचे काम अनेक डॉक्टरांनी केले. त्यामुळे याची जाण ठेवून अझमनगर येथील कोविड केअर सेंटरच्यावतीने सर्व डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर राजू सेठ, मुलाना साजिद, मुलाना मुस्ताक, अब्दुल कादर घीवाले, शहानवाज खान उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व डॉक्टर, नर्स यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी अझमनगर येथील कोविड केअर सेंटरचे सलीम लंडुर, अप्ताफ बंदर, निसर बेळवदी, हमीद नदाफ, इजाज खान, इम्तियाज अंकलगी, इम्तियाज सय्यद, असलम खान पठाण, मुस्ताक मलगणावर आदी उपस्थित होते.