बेळगाव / प्रतिनिधी :
कोरोना व्हायरसने देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाला थोपविण्यासाठी प्रशासन विविध उपक्रम हाती घेत आहे. गुरुवारी विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयात कंट्रोल रूमचे उद्घाटन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाला रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असून कोरोनाबाबतची सर्व माहिती या वॉर रूममधून उपलब्ध होणार आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी कंट्रोल रूम सुरू करण्यात आला आहे. याद्वारे लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱया जनतेवर आरोग्य विभाग व पोलीस खाते लक्ष ठेवणार आहे. याबरोबर जिल्हय़ातील कंट्रोल रूम, क्वारंटाईन झोन, कंटन्मेंट झोन, बफर झोन व आयसोलेशन वॉर्ड यांच्याबरोबर समन्वय साधता येणार आहे. प्रत्येक तालुक्मयातील आरोग्य खात्याचे अधिकारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व इतर कर्मचाऱयांच्या संपर्कात राहणार आहेत. याप्रसंगी पालकमंत्री जगदीश शेट्टर, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार अनिल बेनके, सतीश जारकीहोळी, पोलीस आयुक्त बी. एस. लोकेशकुमार, डीसीपी यशोदा वंटगोडी, स्मार्ट सिटीचे शशीधर कुरेर यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. अधिक माहितीसाठी कोविड-19 हेल्पलाईन क्रमांक 0831-2436960 यावर संपर्क साधावा.