बेकिनकेरे :
पश्चिम भागात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शिवारात मशागतीच्या कामांना सुरुवात करण्यात आली. सध्या देशात लॉकडाऊन असले तरी शेतीची कामे वेळेत व हंगामात होणे आवश्यक आहे. वळीव पाऊस पुरेसा झाल्याने बेकिनकेरेत गुरुवारपासून माळरानावरील नांगरणीचे काम शेतकऱयांनी हाती घेतले. मशागतीला पूरक वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱयांनी नांगरणीच्या कामाला सुरुवात केली आहे.
पश्चिम भागाच्या उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, कुदेमनी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ आदी भागात शेतीकामांना प्रारंभ झाला आहे. विशेषकरून माळरानावर बटाटे, रताळी व नाचणा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. अशा शिवारात मशागतीची कामे सुरू आहेत. याबरोबरच शिवारात शेणखत घालणे, बांध घालणे आदी कामे सुरू आहेत.
पश्चिम भागातील अतिवाड, उचगाव, बेकिनकेरे, कोनेवाडी, बसुर्ते, बाची, कुद्रमनी आदी गावांतून पावसाळी बटाटे व रताळय़ाची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. त्यामुळे बटाटे व रताळी लागवडीसाठी ट्रक्टरच्या साहाय्याने पल्टी करण्याचे कामही सुरू आहे. याबरोबरच तालुक्मयाच्या उद्रार भागातील हंदिगनूर परिसरातील चलवेनहट्टी, मण्णिकेरी, बोडकेनहट्टी आदी गावात पावसाळी बटाटय़ाची मोठय़ा प्रमाणात लागवड केली जाते. यासाठी टॅक्टरच्या साहाय्याने मशागतीच्या कामाला सुरुवात झाली आहे.